राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. दरम्यान आज दिवसभरात राज्यात २१ हजार ८१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १० हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज करोनामुळे १५४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५५,६४,३४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.२५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.