राज्यात 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

0
160

नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी कमी झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्य़ात आला आहे. त्याच प्रमाणे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा व जोरदार वाऱ्यांचा इशारादेण्य़ात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here