राज ठाकरे आता तरी मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

0
107
स्टार-स्पोर्टस वाहिनी विरोधात पुकारलेले आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरेंसह त्याच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि थोरली बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर तिघांना घरी सोडण्यात आलं आहे. राज ठाकरे पुढील उपचार घरीच घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ‘आपण लवकरात लवकर बरे व्हा’, अशी प्रार्थना केली आहे. क्लाईड क्रास्टो म्हणाले, गेट वेल सून राज ठाकरेजी, मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती. तज्ज्ञ नेहमी सांगतात की, मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते. आता आपणही मास्क परिधान करा, असं ट्वीट क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. सोबतच राज ठाकरे यांना लिहिलेल्या मास्कबाबतच्या पत्राची आठवण देखील यावेळी क्लाईड क्रास्टो यांनी करुन दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here