राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

0
80
स्टार-स्पोर्टस वाहिनी विरोधात पुकारलेले आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने त्यांचा पुण्याचा दौरा रद्द झाला. राज ठाकरे यांची मागील काही दिवसांपासून बार वाटत नव्हतं. त्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागली.नंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राज ठाकरेंच्या आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.घरातील इतर सदस्य क्वारंटाईन झाले आहेत.

राज ठाकरे यांचे आज भांडुप येथे तर उद्या पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार होते. हे मेळावे अचानक रद्द करण्यात आले. या मेळाव्याला खुद्द राज ठाकरे संबोधित करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र राज यांची तब्येत यांची तब्येत ठिक नसल्याने हे मेळावे पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here