राधे चित्रपटाला मिळाले आतापर्यंतचे सर्वाधिक व्ह्युज

0
100
Radhye

सलमान खानचा चित्रपट ‘राधे, योर मोस्ट वांटेड भाई’ ईदच्या दिवशी म्हणजेच १४ मे रोजी प्रदर्शित झाला. भारतात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरीही दुबई, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या देशात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हायब्रिड पद्धतीने प्रदर्शित केल्याने या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळालं आहे.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाला ४.२ मिलिअन व्ह्युज मिळाले होते पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट म्हणून  राधे चित्रपटाचं नाव घेतलं जाईल.याविषयी सलमान खाननेही इन्स्टाग्रामवरून माहिती दिली होती.

युएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक जात आहेत. तरीही पहिल्याच दिवशी ३ लाख ७९ हजार अमेरिका डॉलर एवढी या चित्रपटाने गल्ला जमवला आहे. हा चित्रपट हाइब्रिड पद्धतीने प्रदर्शित केला आणि कोणत्याही चित्रपट निर्मात्याने किंवा मंचाद्वारे न चोखाळण्यात आलेला मार्ग त्यांनी चोखाळला जो आतापर्यंतचा एक व्यवहार्य निर्णय ठरला आहे. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या प्रतिसादावरून सलमान खानच्या लार्जर दॅन लाईफ स्टारडमला अधोरेखित केले आहे, जे हिंदी चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांच्या तोडीचे आहे. दिशा पटानीने देखील या चित्रपटात आपली चमक दाखवली असून ती भारताची ‘द’ ग्लैम गर्ल बनण्याच्या तयारीत असल्याचे सिद्ध केले आहे.

‘राधे’ला जो भव्य प्रतिसाद मिळत आहे, केवळ सलमान खानने केलेल्या उदार कार्याचे फलित आहे, जे त्याने समाज आणि गरजू लोकांसाठी आपले कर्तव्य मानून केले आहे, जो राधेला ब्लॉकबस्टर बनवतो आहे. मतितार्थ हा आहे कि, सलमानने ईदसाठी जे वाचन दिले होते, ते कोविडच्या कठीण पार्श्वभूमीवर देखील पूर्ण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here