रायगडमध्ये बुडत असलेल्या MV मंगलम बार्जच्या सर्व 16 सदस्यांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात यश

0
80

रायगडमधील रेवदांडा बंदराजवळ एमव्ही मंगलम बार्ज (फ्लॅट प्लॅटफॉर्म शिप) जहाज आंशिकरित्या बुडाले आहे अशी एमआरसीसी मुंबईला टेलीफोनवर माहिती मिळाली.17 जून रोजी सकाळी रेवदंडा जेट्टी (रायगड जिल्हा) किनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे जहाज आंशिकरित्या बुडाले असल्याची माहिती मिळाली. या बचाव कारवाईत तटरक्षक दलाच्या जहाजासह नेव्ही हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे.

एमव्ही मंगलममधून चालक दलाला वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सुभद्रा कुमारी चौहान दिघी बंदरातून आणि दमणच्या आयसीजी एअर स्टेशन वरून दोन हेलिकॉप्टर बोलाविण्यात आले होते. 6 तासांच्या प्रयत्नानंतर सर्व 16 चालक सदस्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले.जहाज भरल्यामुळे चालक दल घाबरून गेले होते.चालक दलाला रेवदांडा येथे तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here