राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

0
44

सिंधुदुर्ग 16 नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्यालय पत्रकार कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना, त्याचे महत्व आणि त्यापाठीमागील भूमिका याबाबतची माहिती श्री. सातपुते यांनी यावेळी दिली. तसेच श्री. जेठे यांनी या दिवसाचे औचित्य सांगून राष्ट्रीय पत्रकार दिन व त्याबाबत केलेल्या घोषणेची माहिती दिली.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव नंदकुमार आयरे, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, संदीप गावडे, विनोद दळवी, सतीश हरमलकर, गिरीष परब, शांताराम राऊत, रवी गावडे, प्रसाद पाताडे, बाळ खडपकर, लवू म्हाडेश्वर, माहिती सहायक हेमंत चव्हाण आदींनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here