राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

0
108

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. सिक्री यांच्या निधनाने एक अभिनयसंपन्न ज्येष्ठ अभिनेत्री आपण गमावली आहे, या शब्दांत  त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सुरेखा सीकरी या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. 2018 मध्ये महाबळेश्वर येथे एका टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोनचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे वृत्त आले होते. कालांतराने त्या यातून ब-या झाल्या होत्या.लॉकडाऊनदरम्यान 2020 मध्ये त्यांना पुन्हा ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यावेळी आयसीयूत त्यांच्यावर उपचार झाले होते. त्यांच्या मेंदुत झालेले ब्लड क्लॉट औषधांनी बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र शासनाने शूटिंगसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांवर घातलेली बंदी हटविण्याची मागणी केली होती.

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतलेल्या सुरेखा सिक्री यांनी नाटकं, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात काम केले असून अनेक चित्रपटांमधील त्यांच्या सहायक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, बालिका वधू या मालिकेतील भूमिका विशेष लोकप्रिय ठरली असून त्यांच्या कसदार अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आपल्या  दर्जेदार अभिनयातून चित्रपट आणि मालिकांद्वारे घरा-घरांत पोहोचलेल्या सुरेखा सिक्री यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे,  असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here