राष्ट्रीय रक्षा अकादमी तसेच नौसेना अकादमी परीक्षेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या सूचना

0
79

राष्ट्रीय रक्षा तसेच नौसेना अकादमीसाठी बृहन्मुंबईमधील ३६ उपकेंद्रांवर उद्या, रविवार दि. १८ एप्रिल रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी)परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवार व त्याच्यासोबत एका पालकाला प्रवास करणे व कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यासाठी मुभा असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.बृहन्मुंबईमधील 36 उपकेंद्रांवर रविवार दि.18/04/2021 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व नौसेना अकादमी (1) परीक्षा 2021 ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या दि. 13 एप्रिल 2021 रोजी ‘ब्रेक द चेन’ ‘Break The Chain’ आदेशातील मुद्दा क्र. 9 (डी) व महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडील आदेश MCG/A/6202 यातील मुद्दा क्र.1 नुसार उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे.वरील बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here