Covid19 रुग्णसंख्या कमी होत असली तरीही राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत- आरोग्यमंत्री राजेश टोपें

0
77

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू ओसरत आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले.मात्र नागरिक बाहेर मोठ्या प्रमाणाक गर्दी करत आहेत. मुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक जबाबदारीने वागत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या असल्याची माहितीही टोपेंनी दिली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी असल्याचे टोपे म्हणाले. गेल्या 3 आठवड्यामध्ये रुग्ण संख्या स्थिर आहे. मात्र 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल 3 मध्ये अनेक जिल्हे आहे. उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याची माहितीती टोपेंनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे निर्बंध शिथिल केले जाणार नसल्याचे टोपे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here