पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार केला आहे.रेल्वे मंत्रालयाचा पदभार अश्विनी वैष्णव यांनी स्विकारला आहे. पदभार स्विकारताच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात बदल करत कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा आदेश दिला आहे.
कर्मचाऱ्यांची पहिली शिप्ट ही सकाळी 7 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत असेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. वैष्णव यांनी रेल्वेची कमाई कशी वाढवली जाईल यावर विचार विनिमय सुरु केला आहे. नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे 94 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कर्मचाऱ्यांनी तात्काळ या नियमांचे पालन करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.त्याशिवाय वैष्णव यांनी रेल्वेची कमाई कशी वाढवता येईल यावर विचार विनिमय सुरु केला आहे.