वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

0
68

मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Corporation)माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज वांद्रे, विलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण (Vaccination)केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी श्री. ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर, विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत आज प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविड(Covid19) विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुभाष सावंत, माजी महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक सदा परब, शेखर वायंगणकर, श्रीमती रोहिणी कांबळे, संदीप नाईक, युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here