वाघोटन नदी इशारा पातळीजवळ; किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

0
91

सिंधुदुर्ग – खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 5 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 8.250 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाघोटन नदीच्या किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 147.30 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 210 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1471.21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 138(1524), सावंतवाडी – 105(1643.10), वेंगुर्ला – 95.40(1152.60), कुडाळ – 135(1324), मालवण – 152(1624), कणकवली – 210(1602), देवगड – 140(1360), वैभववाडी – 203(1540), असा पाऊस झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.63 मिमी तर एकूण 437.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 75.90 मिमी, दापोली 35 मिमी, खेड 23.80 मिमी, गुहागर 41.90 मिमी, चिपळूण 37. 10 मिमी, संगमेश्वर 28. 10 मिमी, रत्नागिरी 93.10 मिमी, राजापूर 38. 90 मिमी. लांजा 63.90 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here