वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची गरज लागणार नाही, 60 ते 62 रुपयांत मिळणार ‘हे’ इंधन, वाचा नितीन गडकरींचा प्लॅन

0
74

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडत आहे. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता सरकार कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकार सर्व वाहन उत्पादकांना पुढील सहा-आठ महिन्यांत युरो-सहा उत्सर्जन नियमांनुसार फ्लेक्स-इंधन इंजिन बनवण्यास सांगेल.
फ्लेक्स-इंधन पेट्रोल आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे. भारतीय वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल पुढील 15 वर्षात 15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सर्व वाहन उत्पादकांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य केल्यानंतर वाहनांची किंमत वाढणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

इंधनाच्या दरवाढीमुळे सध्या देशातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरात कपात केली जाऊ शकते. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here