विकृतीचा कळस: निर्भया हत्याकांड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती

0
76

मुंबईतील साकीनाका भागात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. नराधमानं पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकून तिच्यावर वार केले आहेत. तिला बेदम मारहान करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मोहन चौहान आरोपीचं नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस कंट्रोल रुममध्ये 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री 3 वाजता फोन आला. त्या फोनवरुन एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार देण्यात आली.आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवले. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. पोलिसांनी पीडित महिलेला आज सकाळी खैरानी रस्त्यावरून उचलून आणले आहे.पीडिता गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.मुंबईसारख्या शहरात या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here