बीसीसीआयच्या माहितीनुसार, भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची कोरोना चाचणी 10 जुलै रोजी करण्यात आली होती. भारतीय संघ सुट्टीसाठी इंग्लंला रवाना झाला आहे. .पंतमध्ये कोरोनाचे आतापर्यंत एकही लक्षण नाही आहे. रिपोर्ट येण्याआधी पंत यूरो कपची मॅच पाहायला गेले होते. त्याच्याबरोबर हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराहदेखील मॅच पाहायला होते.
ऋषभ पंत पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघाचे कोच रवि शास्त्री 11 जुलै रोजी विम्बल्डन फायनल पाहायला पोहोचले होते. तर दुसरीकडे भारतीय संघाचे इतर खेळाडूदेखील कुटुंबियांसोबत सुट्टी साजरी करत आहे. सर्व खेळाडूंना कोरोनाचे एक डोस देण्यात आले आहे. तर दुसरे डोस इंग्लंडमध्ये देण्यात येणार आहे.