पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर 10 वी आणि CBSE 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये CBSE चे चेअरमन, आरोग्य मंत्रालयाचे सेक्रेटरी आणि केंद्रीय मंत्री आमित शाह, निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राजनाथ सिंह आणइ प्रकाश जावडेकर सामिल झाले. ही बैठक व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून झाली.
बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. अशा परिस्थिती आपण त्यांना परीक्षेचा तणाव देणे योग्य नाही. आपण त्यांचा जीव धोक्यात टाकू शकत नाही. बारावीचा निकाल निश्चित वेळेत आणि तार्किक आधारे दिला जाईल. परीक्षांसंदर्भात सर्व पक्षांनी या वेळी विद्यार्थ्यांविषयी संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे असेही त्यांनी अधोरेखित केले