विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून सुरू

0
77

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण आणि येणारी तिसरी कोरोनाची लाट या सर्व बाबी लक्षात घेता अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांनाच अनेक निर्बंध आणि नियम पाळावे लागणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी शनिवार व रविवारी दि. 3 व 4 जुलै, 2021 रोजी RT-PCR कोरोना चाचणीसंदर्भात विधानभवन, मुंबई येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.

विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांना बसण्यासाठी तंबूची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकाच अधिकाऱ्याला मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here