वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून १८ बसफेऱ्या होणार सुरु..

0
98

वेंगुर्ला:-वेंगुर्ले आगारातर्फे उद्या ७ जून २०२१ पासून रेडी, कुडाळ,सावंतवाडी,मालवण आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या अशा एकूण १८ बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहे,अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी दिली.

यामध्ये वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी सकाळी ८.३० वा., सावंतवाडी मठमार्गे वेंगुर्ले ९.४५ वा., वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी दुपारी १.३० वा.,सावंतवाडी मठमार्गे वेंगुर्ले दुपारी २.४५ वा., वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी सायंकाळी ५ वा., सावंतवाडी तुळसमार्गे वेंगुर्ले ६.३० वा., वेंगुर्ले दाभोलीमार्गे कुडाळ सकाळी ७.४५ वा., कुडाळ दाभोलीमार्गे वेंगुर्ले ९ वा.,वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ दुपारी २ वा., कुडाळ मठमार्गे वेंगुर्ले दुपारी ३.१५ वा., वेंगुर्ले दाभोलीमार्गे कुडाळ ४.३० वा.,कुडाळ दाभोलीमार्गे वेंगुर्ले सायंकाळी ६ वाजता,वेंगुर्ले रेडी कनयाळ सकाळी ७ वा., रेडी कनयाळ वेंगुर्ले ८.०५ वा.,वेंगुर्ले देवली मालवण ९.१५ वा., मालवण देवली वेंगुर्ले ११ वा., वेंगुर्ले रेडी कनयाळ दुपारी २ वा.,रेडी कनयाळ वेंगुर्ले दुपारी ३.०५ वा.अशा प्रकारे बसफेऱ्या सुटणार आहेत.अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी,वैद्यकीय उपचारासाठी जाणारे नागरिक व इतर प्रवासी अशा एकूण २२ प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे.

प्रवाशांनी मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे.प्रत्येक दिवशी प्रत्येक गाडीची बसफेरी पूर्ण झाल्यानंतर सॅनिटायझेशन केले जाणार आहे.सध्या सकाळी ८.१५ वेंगुर्ले मठमार्गे सिंधुदुर्गनगरी कणकवली व सायंकाळी ५.३० वा कणकवली वेंगुर्ले अशी बसफेरी सुरु आहे.प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य मार्गावरही बससेवा सुरु करण्यात येईल.उद्यापासून सुरु होणाऱ्या सदरच्या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा,असे आवाहन वेंगुर्ले एस.टी. स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here