वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांचा धडाका

0
76

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने

प्रतिनिधी: पांडुशेठ साठम

वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून , खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून व जि. प. गटनेते नागेंद्र परब व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यातून विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विकास कामांची भूमिपूजने, उदघाटने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त आलेले आमदार वैभव नाईक यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

यामध्ये आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा वाडीत स्ट्रीट लाईटचे उदघाटन, तर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा ते कदमवाडी रस्ता निधी १० लाख रु, वेताळ बांबर्डे कपिलनगर समाजमंदिर इमारत उभारणी निधी २९ लाख, पुरहानी रस्ते दुरुस्ती अंतर्गत वेताळ बांबर्डे वाघभाटला आंगणेवाडी रस्ता निधी १० लाख, जिल्हा नियोजन अंतर्गत किनळोस रस्त्याला जोडणारा राणेवाडी सावंतवाडा ग्रा.मा. १४६ वर मोरीचे बांधकाम करणे, जिल्हा नियोजन अंतर्गत आवळेगाव हिर्लोक, निवजे, आंबेरी रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, हिर्लोक येथे व्यायामशाळा उभारणे, जनसुविधा योजनेंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत हिर्लोक किनळोस ग्रामपंचायत विस्तारीकरण करणे, २५/१५ अंतर्गत कुसगाव मुख्य रस्ता ते लिंगेश्वर मंदिर मार्गे दलित वस्तीमार्गे देऊळवाडी जाणारा रस्ता, नारुर क. नारुर मुख्य रस्ता ते आंब्याची घाटी जाणारा रस्ता, निवजे मुख्य रस्ता ते बिब्याची वाडी रस्ता, निवजे खिंड ते बाक्रेघर जाणारा रस्ता, रांगणा तुळसुली कदमवाडी स्मशानशेड कडे जाणारा रस्ता, परबवाडी रस्ता, आईरवाडी रस्ता या कामांची भूमिपूजने करण्यात आली.

यावेळी वेताळ बांबर्डे येथे जि. प. गटनेते नागेंद्र परब,कुडाळ संघटक बबन बोभाटे, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, विभाग संघटक संदीप सावंत, दीपक आंगणे, उपसरपंच दिनेश कदम, भाई कलिंगण, श्री, नाईक, सलीम शेख, सौ. परब, बाळा भोसले, कानू शेळके, आनंद सामंत, योगेश ठाकूर , शैलेश घाटकर, पिंटू दळवी हिर्लोक येथे महिला विभाग प्रमुख कन्याश्री मेस्त्री, चंद्रकांत सावंत, विजय परब, मंगेश जाधव, मंगेश परब, डॉ. नंदनशिव, बाजीराव झेंडे, कुसगाव येथे सरपंच स्नेहा सावंत, सज्जन सावंत, संतोष सावंत, बाळू घाडी, गोविद आईर, प्रवीण आचरेकर, सुरेश लाड, अजय चव्हाण, शशिकांत आचरेकर, आबा कुणकेरकर,
किनळोस येथे राजू सावंत, दिवाकर बागवे, संतोष सावंत, अनंत सावंत, रविकांत सावंत, यशवंत सावंत, नाना सावंत, अमोल सावंत, अस्मिता सावंत, नारुर येथे उपविभागप्रमुख प्रदीप गावडे, शाखा प्रमुख जगदीश सरनोबत, मुकुंद सरनोबत, आबा सावंत,नारुर सरपंच सौ. निकम, आबा तळेकर, अशोक देसाई, दिगंबर गावडे, पुंडलिक परब, रामचंद्र परब,रांगणा तुळसुली येथे शा. प्र. प्रदीप गावडे, धनंजय बिरमोळे, दाजी आईर, अंकुश तुळसुळकर, अमर परब, चंद्रहास बिरमोळे, अरविंद गावडे., दिनेश गावडे, राकेश गावडे, निवजे येथे शाखा प्रमुख संतोष पिंगुळकर, श्री. पालव, युवासेनेचे श्री. जाधव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपिस्थत होते.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here