वेबसीरीजमध्ये रवीना टंडन आता नव्याकोऱ्या रुपात दिसणार

0
86

आता रवीना टंडन नेटफ्लिक्सच्या आगामी क्राईम थ्रिलर ‘अरण्यक’ मधून डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.’मस्त मस्त गर्ल’ 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नेटफ्लिक्सच्या आगामी क्राईम थ्रिलर ‘अरण्यक’ मध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. महिला अधिकारी असताना ड्यूटी आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या दरम्यान सहन करावा लागणारा त्रास आणि पूर्वग्रह यावर या सीरीजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

रवीना आपल्या असंख्य चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्यामाध्यमातून संपर्कात राहते. रवीना सतत आपले फोटो आणि व्हीडिओही शेअर करत असते. आता रवीना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमातून डेब्यू करत आहे. ‘अरण्यक’ या सिरीजने चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. नुकताच ‘अरण्यक’चा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. कस्तुरी डोग्रा एसएचओ हे तिच्या भूमिकेचं नाव आहे. ही पोलिस अधिकारी विविध आव्हानात्मक रहस्यं उलगडते. या सिरीजमध्ये रोमांच, रहस्य आणि थ्रील अनुभवता येणार आहे.10 डिसेंबरला ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.

अरण्यक सिरीजचं शूटिंग सिरोनाच्या डोंगराळ भागात, जंगलात करण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये रवीनासोबतच आशुतोष राणा मेघना माळी, झाकीर हुसैन आणि परमब्रता चॅटर्जी हेसुद्धा मुख्य भूमिकेत दिसतील. नेटफ्लिक्सही सध्या मोठमोठ्या शहरांच्या कथा सांगण्याऐवजी लहान-लहान गावं, खेडी यांच्यावर लक्ष केंद्रित करते आहे. ही वेब सिरीजही तशीच आहे. यात 47 वर्षांची रविना टंडन अनोख्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विनय वायकुल यांनी दिग्दर्शित केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here