गमेश्वर- मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु असून रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी पूलांची कामे जोमाने सुरु आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच पूलांची कामे पूर्ण झाली आहेत.
संगमेश्वर नजिकच्या अपघात प्रवण क्षेत्रातील 36 किमी लांबीच्या धोकादायक क्षेत्रात छोट्या मोठ्या अशा एकूण 7 पूलांपैकी 3 पूलांची कामे सध्या वेगाने सुरु असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली आहे. दरम्यान संगमेश्वर नजिकच्या शास्त्री नदीवरील नव्या पूलाचे काम तब्बल 80 वर्षांनंतर हाती घेण्यात आले आणि सध्या हे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या पूलाचे उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.