शाहरुख-सलमान खानचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल

0
81

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडचणीत सापडला आहे. शाहरुखला त्याचा खास मित्र सलमानचा पाठिंबा मिळाला आणि केवळ भाईजानच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या किंग खानसोबत आहे.या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सलमान खानचा शो ‘दस का दम’मधील आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खान शाहरुखला एक प्रश्न विचारतो. त्यानंतर शाहरुख खान म्हणतो की “सलमान जर मी कधीही अडचणीत असेल किंवा माझे कुटुंब कधी अडचणीत असेल सर्वात आधी तू येशील”. हे ऐकल्यानंतर सलमान “नक्कीच” म्हणतो आणि समोर येऊन शाहरुख खानला मिठी मारतो. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका यूजरने ‘ही आहे खरी मैत्री’ असे लिहिले तर दुसऱ्या युजरने ‘वाह करण अर्जुन’ अशी कमेंट केली.

शाहरुखने आर्यनसाठी सतीश मानशिंदे यांच्यासह अमित देसाई या मुंबईतील मनामांकित वकीलांचीही नियुक्ती केली आहे. वकील अमित देसाई यांनी सलमान खानची केस लढली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here