शिरगाव मधील शासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या नवीन ऍम्ब्युलन्स ला पार्किंग साठी शेड नव्हती.यासाठी शिरगाव मधील सर्व ग्रामस्थांना आव्हान केले होते त्याला प्रत्येकाने सकारात्मक साथ देत अपेक्षित खर्चा एवढे पुरेशे पैसे जमा केलेत.सर्वांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा गावातील सर्वांच्या एकविचाराने आणि एकजुटीतून आपण कोणतेही लक्ष साध्य करू शकतो हे ग्रामस्थांनी दाखवून दिले.सर्वांच्या सहकार्याने आपल्या शिरगाव PHC येथील ऍब्युलन्स पार्किंग शेड चे काम पूर्ण झाले आहे.
शनिवार दि.10/07/2021 रोजी सकाळी 10.00 वा. ऍम्ब्युलन्स चे चालक श्री.उघाडे यांच्या हस्ते कोव्हिडचे नियम पाळून पार्किंग शेडचे उद्धघाटन केले.गाडीची जास्तीत जास्त काळजी घेतली जावी म्हणून अँब्युलन्स चालकांच्याच हस्ते उद्धघाटन करून चालकांचा शिरगाव वासीयांनी सन्मान केला आहे .यावेळी मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.