सिंधुदुर्ग – घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा संपन्न झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ सुरू झाले आहे. १०० कोटी रु खर्चून दोडामार्ग येथे औषधी वनस्पती संशोधन प्रकल्प साकारला जाणार आहे. मेडिकल कॉलेजसाठी 996 कोटी रु मंजूर झालेत.एवढेच नव्हे तर आपल्या मेडिकल कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर हे महाराष्ट्रातील पहिल्या दोन तीन क्रमांकावर आहे.
परंतु मेडिकल कॉलेज ला मान्यता मिळविताना अनेक मांजरे आडवी येतात त्यावर आम्ही नक्कीच मात करू. जे कोणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत ते शिवसेनेला अडचणी आणत नाहीत तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले आहेत ज्यांना डॉक्टर होण्याची इच्छा आहे त्यांच्या भवितव्याशी ही मंडळी खेळत आहेत.त्यांनी कितीही अडचणी आणल्या तरीही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेडिकल कॉलेज पूर्ण करून दाखवणारच.येणाऱ्या निवडणुका जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे.त्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागले पाहिजे,मेहनत घेतली पाहीजे.कुडाळ मध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.आ. वैभव नाईक जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात खेचून आणत असून विकास कामांसाठी जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा पुरविला जाईल असे ना.उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, अमरसेन सावंत, बबन शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. सदस्य अनुप्रीती खोचरे राजू कविटकर, उपसभापती जयभारत पालव, पं. स. सदस्य श्रेया परब, मथुरा राऊळ, तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख रामभाऊ धुरी, उपविभागप्रमुख पप्पू म्हाडेश्वर, अँड. सुधीर राऊळ, रमा ताम्हाणेकर,विकास कुडाळकर, अतुल बंगे, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन कदम, सुनील सावंत, शेखर गावडे,बाळा कोरगावकर, अनुप नाईक,दीपक आंगणे, अवधूत मालवणकर सचिन काळप, रुपेश पावसकर, प्रभाकर वारंग, अजित करमलकर,कौशल जोशी, अनिल खोचरे, अजित परब, आत्माराम सावंत, सागर म्हाडगूत, प्रशांत म्हाडगूत,दिनेश गोरे, , यशवंत कदम, तुषार परब, बाबी भिंगारे, संतोष नागवेकर, आनंद परब, दीपक सावंत, राम तावडे, दादा मेस्त्री, शिवानी ठाकूर, राम कोकरे आदींसह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा.प. सदस्य, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.