शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

0
82

अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप पक्ष शिवसेनेविरोधात आक्रमक झाला. त्यातूनच आज त्यांनी शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता.

शिवसेना भवनवर मोर्चा येणार, हे समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासहअनेक महिला शिवसैनिकही हजर होत्या. या आंदोलनातून काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगत हा मोर्चा शिवसेना भवनपासून काही अंतरावरच अडवला. शिवेसना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होता असा गंभीर आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे.

आंदोलकांना अटक करून पोलीस गाड्यांमधून नेत असतानाच्या गडबडीत काही मोर्चेकरी पोलिसांचे अडथळे झुगारून शिवसेना भवनच्या दिशेने आल्याचे वृत्त पसरले आणि शिवसैनिक त्या दिशेने धावले. त्यावेळी ‘भाजयुमो’चे मोर्चेकरी आणि शिवसैनिकांत हाणामारी झाली. यात अनेक मोर्चेकऱ्यांना दुखापत झाली. भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली असं महिला आघाडीचं म्हणणं आहे. करोना नियमांचे पालन न केल्याबद्दल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here