शिवसेनेला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही-शिवसेना खासदार संजय राऊत

0
99

मुंबईमध्ये बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे.

या गदारोळानंतर शिवसेनेकडून गुंडगिरी केली जात असल्याची टीका करण्यात येत आहे.यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ‘आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही’ असा इशाराच भाजपला दिला आहे.

 मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकलेला आहे, त्या वास्तूच्या दिशेने कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली यामुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे’ असेही राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here