श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्याचे आ.वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

0
62

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर- नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्याला कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले.


परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. आमदार वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर- नारायण यांचे दर्शन घेतले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,नगरसेवक मंदार केणी, बाबी जोगी,सेजल परब, प्रसाद आडवणकर,बाळू नाटेकर, तृप्ती मयेकर,सन्मेश परब, तपस्वी मयेकर,पंकज सादये,महेंद्र पराडकर,प्रवीण लुडबे,प्रवीण रेवंडकर,यशवंत गावकर आदी उपस्थित होते.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here