संगीतकार ‘राम लक्ष्मण’ फेम ‘लक्ष्मण’ कालवश

0
90

ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ लोकप्रिय राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण यांच्या निधनामुळे मनाला भावतील अशी अवीट गोडीची गाणी देणाऱ्या राम-लक्ष्मण युगाचा आज अस्त झाला आहे.. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीने, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी मातीतील चित्रपटांपासून ते हिंदीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मैने प्यार किया, हम आपके है कौन अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते.

दादा कोंडके यांनीच या दोघांना राम लक्ष्मण हे नाव दिले होते.राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील होते. त्यांचे थोरले बंधू सुरेंद्र पाटील यांच्यासह 1975 मध्ये म्युझिक इंडस्ट्रीत आले. दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर दिली. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या पांडू हवालदार (1975) , ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.

राम लक्ष्मण यांना सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटा संगीतातील सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक सिंगर आणि सर्वोत्कृष्ट गीत हे तीन प्रमुख श्रेणीतील पुरस्कार मिळवीले होते. याच चित्रपटाने फिल्मफेअरमध्ये तब्बल 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. यात संगीतातील तीन पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट मेल डेब्यू, सर्वोत्कृष्ट फिमेल डेब्यूचा समावेश होता. त्यानंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here