सप्टेंबरपर्यंत ब्लॅक फंगसच्या औषधी टॅक्स फ्री! अजित पवारांच्या प्रयत्नांना यश

0
104

कोरोनाविरुद्धची लढाई सहज, सोपी, सुसह्य करण्यासाठी कोरोनावरील औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्याची, त्यावरील कर कमी किंवा माफ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 मे रोजी झालेल्या 43 व्या जीएसटी परिषदेत केली होती. कोरोनावर उपचारामध्ये लागणाऱ्या औषधांवर करकपातीचा निर्णय केंद्र सरकारने आज जाहीर केला. यामध्ये ब्लॅक फंगसवरील औषधांवर कुठल्याही प्रकारचा कर लागणार नाही असे जीएसटी कौन्सिलच्या 44 व्या बैठकीनंतर शनिवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की कोरोनावर उपचार घेताना लागणाऱ्या औषधींवर आणि उपकरणांवर लागणारा कर कमी करण्यात आला आहे.

जीएसटी दरांमध्ये करण्यात आलेली ही कपात केवळ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. यानंतर पुन्हा जुने दर लागू केले जातील.ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमाब आणि एम्फोथ्रेसिन-बी या औषधींवर कुठल्याही प्रकारचा कर लावला जाणार नाही. यापूर्वी या औषधींवर 5% जीएसटी घेतला जात होता.त्याशिवाय रुग्णवाहिकांच्या जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आता रुग्णवाहिकांवर 12% टक्के जीएसटी लावले जाईल. यापूर्वी रुग्णवाहिकां कडून 28% जीएसटी वसूल केला जात होता.हेपारीन औषधींवरील कर 12% न लावता 5% लावले जाणार आहे.रेमडेसिवीरवर आता 12% नाही तर 5% कर घेतले जाईल. व्हेंटिलेटरवर लावले जाणारे 12% कर आता 5% करण्यात आले. मेडिकल ग्रेड ऑक्सीजनवर 12% कर लावले जायचे, ते आता 5% झाले.BiPaP मशीनीवर लावले जाणारे 12% कर घटवून 5% केले.ऑक्सीजन काँसंट्रेटरवर आता 12% नाही तर 5% कर लागणार आहे.इलेक्ट्रिक फर्नेसेजवरील कर घटवून 5% करण्यात आले. यापूर्वी 12% होते. तापमान मापक यंत्रावर लागणारे 12% कर घटवून 5% झाले.हाय-फ्लो नेजल कॅनुला डिव्हाइसचे कर 12% वरून 5% करण्यात आले.हँड सॅनिटायजरवर 18% कर होता आता 5% करण्यात आले.ऑक्सीमीटरवर 12% जीएसटी न घेता 5% घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here