येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. अशामध्ये बँकांच्या या सुट्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती असल्याने प्लॅनिंग करणे सोपे जाईल व तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
5 सप्टेंबर – रविवार,9 सप्टेंबर – तीज हरितालिका,10 सप्टेंबर – गणेश चतुर्थी,11 सप्टेंबर – दुसरा शनिवार,12 सप्टेंबर – रविवार, 18,19 शनिवार,रविवार.हे दिवस सुट्ट्यांचे राहणार आहेत.