सरकारने कोव्हॅक्सिन-कोविशिल्डच्या मिश्र चाचणीला दिली मंजुरी

0
126

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोविड -19 लसीच्या मिश्र चाचणीच्या अभ्यासाचे निकाल जाहीर केले. या अभ्यासात 98 जणांचा समावेश करण्यात आला होता. कोव्हिशिल्डचा पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्यास काय होईल? कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या च्या दोन्ही डोसच्या तुलनेत लसीच्या मिश्रणाचे परिणाम किती वेगळे आहेत? या प्रश्नांची उत्तरे या अभ्यासाद्वारे देण्यात आली आहेत.

कोविड -19 लसीचे मिश्रण म्हणजेच जर तुम्ही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले असतील, तर त्याच्या तुलनेत दोन्ही लसींचा एक-एक डोस तुम्हाला कोविड -19 पासून जास्त संरक्षण देतो असे या अभ्यासात आढळून आले आहे. बोला, रोटा सारख्या व्हायरसवर लसींचे कॉम्बिनेशन समान तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आले होते.त्याचे परिणाम चांगले होते. तेव्हापासून, अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशनवर अभ्यास करण्यात आले किंवा चालू आहेत.

उत्तर प्रदेशात चुकून 20 लोकांना पहिला डोस कोविशिल्डचा आणि कोव्हक्सींनचा दुसरा डॉस दिला दिला गेला होता. त्यां आयसीएमआरने मिश्र लसी घेतलेल्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले. 20 पैकी फक्त 18 लोकांनी अभ्यासात भाग घेतला. त्यांना पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा दिला गेला होता. या अभ्यासात, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे दोन-दोन डोस घेणा-या 40-40 लोकांचे दोन स्वतंत्र गट बनवण्यात आले होते अशाप्रकारे, हा अभ्यास 98 लोकांवर करण्यात आला. या अभ्यासात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डोस दिल्यानंतर 30 मिनिटांच्या आत कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत.मिक्सिंगमुळे कोरोना विषाणूच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध चांगले परिणाम मिळाले आहेत. लस मिक्सिंग केल्याने अँटीबॉडीज अधिक तयार होतात आणि दीर्घकाळ टिकतात.लस मिक्सिंग आणि एकाच लसीचे दोन्ही डोस घेतल्याने सौम्य दुष्परिणाम दिसले. फक्त सूज, वेदना यासारखी लक्षणे दिसली आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here