सरोज खान यांच्या जीवनावर चित्रपट

0
59

बॉलिवूडची दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे 03 जुलै 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली. आता सरोज खान यांच्या निधनाच्या एक वर्षानंतर निर्माता भूषण कुमार यांनी सरोज खान यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

सरोज खानच्या यांच्या पहिल्या स्मृतीदिनी टी-सीरीजने त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सरोज खान यांची मुलगी सुकैना आणि मुलगा राजू खान यांच्याकडूनही चित्रपटासाठी परवानगी घेतली आहे.आपल्या निवेदनात भूषण कुमार म्हणाले की, सरोज खान यांनी आपल्या नृत्याने कलाकारांची भूमिका केवळ संस्मरणीयच केली नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शनातही क्रांती घडवून आणली आहे.त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. माझ्या आईला इंडस्ट्रीकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला. आणि आता तिची कहाणी संपूर्ण जग बघेल ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सन्मानाची बाब आहे असे त्यांचा मुलगा राजू खान म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here