सलग 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू सिंधू!

0
99

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर मोहोर उमटवली आहे. भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या बी बिंग जियो हिचा 21-13, 21-15 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.रविवारी सायंकाळी हिंदुस्थानची पी.व्ही. सिंधू आणि चीनची बी बिंग जियो यांच्यात कांस्यपदकासाठी सामना रंगला. सिंधूने दमदार सुरुवात केली असून पहिला सेट 21-13 असा आपल्या नावावर केला 

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. सुशीलने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here