गजवदना’ प्रॉडक्शन्स’ आणि ‘शोबॉक्स एंटरटेन्मेंट’ची निर्मिती असलेला‘एकदा काय झालं…’या चित्रपटाला ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टन 2021’ मध्ये तीन नामांकने मिळाली आहेत. सुमित राघवनला सर्वोत्कृष्ट अभिनेता, अर्जुन पूर्णपात्रेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार तर ‘रे क्षणा…’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळाले आहे. याशिवाय चित्रपटाची ‘शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल 2021 ’मध्येही निवड झाली आहे.
या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत अर्जुन पूर्णपात्रेची निवड तब्बल 1500 मुलांच्या चाचणीतून केली गेली. “हा मुलगा जळगाव येथील चाळीसगावचा आहे आणि या नामांकनाद्वारे त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे.
या चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले अशा नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराची यात मध्यवर्ती भूमिका आहे. ही ऐका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमील शृंगारपुरे व सौमेंदू कुबेर यांची शोबॉक्स एंटरटेन्मेट, अरुंधती दाते, अनुप निमकर, सलील कुलकर्णी तसेच नितीन प्रकाश वैद्य यांची ‘गजवदना’ प्रॉडक्शन्स’ यांच्यातर्फे संयुक्तपणे होत आहे.