दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानू सावरलेल्या नाहीत. दिलीप कुमार यांच्या आजारपणात नेहमी खंबीरपणे असणाऱ्या सायरा बानू त्यांच्या जाण्याने पुरत्या कोलमडून गेल्या आहेत. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
सायरा बानू यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. ऑक्सिजनची पातळीही खालावलेली आहे. त्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. पण आणखी 3 ते 4 दिवस रुग्णालयातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सायरा बानूंची तब्येत स्थिर आहे.