सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

0
86

सिंधुदुर्ग– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 971.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 27(1116), सावंतवाडी – 87(1209.7), वेंगुर्ला – 00(752.4), कुडाळ – 18(831), मालवण – 05(904), कणकवली – 02(1051), देवगड – 02(827), वैभववाडी – 59(1081), असा पाऊस झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here