सावंतवाडी शिवाजी चौक मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे निधन

0
79


सावंतवाडी – प्रतिनिधी – संजय भाईप
शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी चे माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे जवळचे मित्र ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी गुरुनाथ मधुकर वालावलकर वय(६५) यांचे आज सकाळी सहा च्या दरम्यान ने हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

गुरु वालावलकर हे मुळ कुडाळ तालुक्यातील वालावल येथील व दहा वर्षां पूर्वी आकेरी येथे घर बांधून वास्तव्यास आलेले, मात्र त्यांचे बालपण सबनिसवाडा येथेघ गेले, गवळी नाका येथील साळगावकर यांच्या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये त्यांचे उठण्या बसण्याचे ठिकाण होते,बबन साळगावकर यांच्या सोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात पण गुरु वालावलकर यांचे योगदान असायचे,शिवसेनेचे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप होती,कुडाळ शिवसेना शाखा स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here