सिंगापूरचे मुंबईतील कौन्सिल जनरल गॅविन चे (Gavin Chay) यांनी आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सदिच्छा भेट घेतली.सिंगापूरचे मुंबईतील कौन्सिल जनरल गॅविन चे (Gavin Chay) यांचे उत्तराधिकारी म्हणून चिओंग मिंग फुंग (Cheong Ming Foong) हे काम बघणार आहेत. श्री. गॅविन चे यांना यावेळी निरोप देण्यात आला तर श्री चिओंग मिंग फुंग यांचे उद्योगमंत्र्यांनी स्वागत केले. राज्यातील उद्योजकांना सिंगापूर महावाणिज्य दुतावासातर्फे यापुढेही सातत्याने सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील औद्योगिक आणि सांस्कृतिक संबध अधिक वृद्धींगत व्हावेत, अशी अपेक्षा उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केली.