सिंधुदुर्ग:कणकवली तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पाऊस

0
89

सिंधुदुर्गजिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 23.2 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3064.5625 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-25 (3030), सावंतवाडी-23 (3350.1), वेंगुर्ला-13.6 (2447.4), कुडाळ-21 (2961), मालवण-23 (3271), कणकवली-37 (3372), देवगड-24 (2666), वैभववाडी-19 (3419) असा पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here