सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली कोरोनाची चाचणी ;सर्व प्रवाशांनी चाचणी करून घ्यावी – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

0
226

सिंधुदुर्ग– केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई परत आल्या. केरळातून परत आल्यावर कुडाळ रेल्वेस्थानकात आरोग्य पथकाकडून दोघांनीही कोरोनाची चाचणी करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीती न बाळगता आपली कोरोना चाचणी करुन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोनावर मात करता येईल असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी या केरळ येथील आपल्या मूळगावी गेल्या होत्या. आज सकाळी त्या नेत्रावती एक्सप्रेसने सहकुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतल्या. परतल्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. तसेच कोल्हापूर येथील जी.एस.टी. भवनमध्ये उपायुक्त असलेले त्यांचे पती श्री पिल्लई यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या तपासणीच्या कामाचा आढावा घेऊन सुरू असलेल्या तपासणीबाबत समाधान व्यक्त करून पथकाच्या कामाचे कौतुकही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here