सिंधुदुर्ग : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविणेसाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यां कडून विविध प्रयोग करणेत येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची ईच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होवून आणखीन उमेदीने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रोत्साहन मिळण्याच्या उददेशने राज्यामध्ये पिकस्पर्धा राबविणेत येत आहे. त्यानुसार खरीप हंगाम २०२१ मध्ये सावंतवाडी मध्ये भातपिकस्पर्धा आयोजित करणेत आलेली आहे.
तालुकास्तरीय भात पिक स्पर्धेत भाग घे ण्याकरिता दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ ही अंतिम तारीख आहे .तरी इच्छूक शेतकऱ्यांनी अर्ज वेळेत सादर करावेत. स्पर्घेत भाग घेणेकरिता शुल्क ३००रुपये मात्र चलनाने शासकीय कोषागारात जमा करावी. भाग घेणा-या शेतक-याच्या नावावर जमीन पाहिजे व ती जमिन तो स्वतः कसत असला पाहिजे तसेच किमान १० गुंठे सलग भातपिक क्षेत्र पाहिजे. तरी भातपिक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे . अधिक माहितीकरीता ग्राम पातळीवरील कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सांवतवाडीच्या तालुका कृषि अधिकारी सावंतवाडी रूपाली पापडे यांनी केले आहे.