सिंधुदुर्ग:भारत सरकार शिष्यवृत्तीला 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ

0
113

सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते आहे. सन 2020-21 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु.जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करणेची मुदतवाढ दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. तरी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण दिनांक 31 ऑगस्ट 2021 अखेर त्वरीत करावे.

नवीन अर्ज नोंदणी करणे व अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्‌भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.02362-228882 येथे संपर्क साधावा. असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here