सिंधुदुर्ग:वागदे येथील स्ट्रीट लाईट कामाचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

0
68

खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत,आ. वैभव नाईक यांचे विशेष प्रयत्न

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

सिंधुदुर्ग:खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून वागदे मांगरवाडी, नमसवाडी, देऊळवाडी, टेंबवाडी मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईटसाठी ६ लाख ५५ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.वागदे गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेला वेळोवेळी साथ दिली आहे. त्यामुळे वागदे गावातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्याबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर,सरपंच पूजा घाडीगावकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, भूषण परुळेकर, गणेश राणे, कल्पेश सुद्रिक, सचिन आचरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र कदम, ग्रा. प. सदस्य सुषमा गोसावी,विना सरंगले,सुनिधी आर्डेकर, रवींद्र गावडे, श्रीधर घाडीगावकर,दिलीप गावकर,अंकुश घाडीगावकर शिरीष घाडीगावकर, गणपत घाडीगावकर, कैलास घाडीगावकर, अमित घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, शरद सरंगले, बाळा आर्डेकर, चंद्रकांत गोसावी-गुरुजी, सुधाकर गोसावी, रमेश राणे, शंकर घाडीगावकर,सुनील गोसावी, सुनील सरंगले, सुभाष सरंगले, शशिकांत गोसावी, रवी गोसावी, अर्चना राणे, प्रभावती राणे, आरती राणे आदी उपस्थित होते.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here