सिंधुदुर्गात आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्याची विशेष मोहिम

0
58

सिंधुदुर्ग– इंडिया पोस्ट पेमेंट बँक व्दारे 30 ऑगस्ट व 31 ऑगस्ट 2021 रोजी आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्याची विशेष मोहिम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आधार कार्डला मोबाईल अपडेट करण्याचे अनेक फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

सरकार कडून दिली जाणारे सर्व प्रकारचे अनुदान जमा होण्यासाठी आधार आर्डला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याससाठी आधार कार्डला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

नवीन पॅनकार्ड काढण्यायसाठी आधार कार्डला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

आपल्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार कार्डला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

सर्व सुविधा उपलब्ध करुन घेणेकरिता आधार कार्ड अपडेट करुन घेणे जरुरीचे आहे.

आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या सुविाधेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here