सिंधुदुर्ग जिल्हयात २६ ते २८ ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

0
52

खाजगी क्षेत्रातील कारखाने, उद्योग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉपस्‍ व इतर व्यवसाययांना सद्य:स्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हयातील बेरोजबार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळावा २६ ते २८ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरीच्या शोधातील उमेदवारांनीही याच पोर्टलवर स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन ॲप्लाई केलेल्या उमेदवारांना उद्योजक मुलाखतीसाठी ऑनलाईन तारीख व वेळ देवून मुलाखत ऑनलाईन घेवून अंतिम निवड करतील किंवा त्याच्या अटीशर्तीना ग्राह्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून अंतिम निवड करु शकतील.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, उमेदवारांनी ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी ०२३६२ २२८८३५, ९४०३३५०६८९, या क्रमांकावर संपर्क करावा,किंवा ईमेल-sindhudurgrojgar@gmail.com असे आवाहन शा.गि.पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here