सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय चौथ्या इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
78

सिंधुदुर्ग: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजित १८ वर्षाखालील जिल्हास्तरीय चौथ्या इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हास्तरीय चौथ्या गेम्स स्पर्धाचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

२४ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुले, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलांच्या तर, २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धा. व ३० नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

वरील दिलेल्य खेळामधील आयोजनाच्या सुचना पुढीलप्रमाणे आहेत. कबड्डी, खो-खो व बास्केटबॉल या खेळाकरिता, खेळाडूची जन्मतारीख १ जानेवारी २००३ रोजीची किंवा त्यानंतरची असावी.

खेळाडूने सोबत – आधारकार्ड,१०वी बोर्डचे प्रमाणपत्र.कबड्डी या खेळाकरिता खेळाडूचे वजन १८ वर्षाखालील मुले-७० किलोखाली व १८ वर्षाखालील मुली-६५ किलोखालील असणे आवश्यक आहे. कबड्डी या खेळाकरिताचे वजन स्पर्धेपुर्वी एक तास अगोदर घेण्यात येईल. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे (क्लब) यांचे संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता खेळाडूंनी उपस्थितीत रहावे व शाळाबाह्य खेळाडुंना जिल्हास्तरीय निवडचाचणीसाठी संधी दिली जाईल. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here