सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सन 2021 वितरण कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आयोजित

0
111

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सन 2021 वितरण कार्यक्रम कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करुन 5 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे अध्यक्षतेखाली व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.

या वेळी कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), सर्व विषय समिती सभापती जिल्हा परिषद, सभापती, पंचायत समिती सर्व, सर्व सदस्य जिल्हा परिषद, सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषद व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व .हे उपस्थित असणार आहेत.अशी माहित एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी दिली 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here