सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 34 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 863 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 529 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 282 आणि व्हेंटीलेटरवर 42 रुग्ण असून 4 मृत्यू झाले आहेत
देशात गेल्या 24 तासांत 46 हजार 498 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. दरम्यान, 58 हजार 540 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 978 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतांचा हा आकडा गेल्या 76 दिवसांत एक हजारांपेक्षा कमी आला आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी 880 लोकांचा कोरोनाने जीव घेतला होता.रविवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत 13 हजार 34 ने घट झाली होती. देशात सध्या 5 लाख 68 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.