सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

0
108
सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा
सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा -रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा

सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर 9 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्या पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 102.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 228.1840 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 51.01 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 40.3240, अरुणा – 19.5368, कोर्ले- सातंडी – 20.8380 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.7340, नाधवडे – 2.2432, ओटाव – 1.2690, देंदोनवाडी – 0.6009, तरंदळे – 0.9410, आडेली – 0.4210, आंबोली – 1.1960, चोरगेवाडी – 1.0400, हातेरी – 1.1750, माडखोल – 1.6900, निळेली – 1.0380, ओरोस बुद्रुक – 0.9740, सनमटेंब – 1.2240, तळेवाडी – डिगस – 0.2680, दाभाचीवाडी – 0.8180, पावशी – 1.6390, शिरवल – 0.9940, पुळास – 1.2520, वाफोली – 0.5880, कारिवडे – 0.5160, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.1020, ओझरम – 1.1150, पोईप – 0.2520, शिरगाव – 0.3260, तिथवली – 0.7470, लोरे – 0.9150 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here